मुंबई : खाद्यपदार्थांतून गुंगीचे औषध देऊन १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीविरोधात चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी आठ महिन्यांची गरोदर असून तिच्या आत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : आनंदाचा शिधाप्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दिलासा, निविदेतील अटींना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या
नोव्हेंबरमध्ये पीडित मुलगी खेळत असताना खाऊ देण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला घरी नेले व तांदळाच्या पेजमधून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी कोणालाही माहिती दिल्यास तिला व तिच्या आत्याला मारून टाकण्याची धमकी दिली. पीडित मुलगी गरोदर असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तिच्या आत्याच्या तक्रारीवरून याप्रकरणी ५० वर्षीय आरोपीविरोधात बलात्कार व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.