मुंबई : अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अंधेरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पीडित मुलगी गतिमंद असल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी गर्भवती असून आरोपीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार

पीडित मुलगी कुटुंबियांसोबत राहते. आरोपीने नोव्हेंबर २०२३ मध्ये पीडित मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. नुकतीच पीडित मुलीला डॉक्टरांकडे नेले असता ती अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत समजले. मुलीला याबाबत विचारले असता तिने अटक आरोपीने केलेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबियांना दिली. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी अंधेरी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यानंतर आरोपीला शुक्रवारी अंधेरी परिसरातून अटक करण्यात आली. कुपर रुग्णलायात पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader