मुंबई : भाजपतर्फे पक्षाचा विस्तार आणि वाढीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात संजय निकम आणि पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी माथाडी कामगार युनियनच्या तब्बल २९ हजार माथाडी कामगारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप – महायुती सरकार कामगारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी विविध प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही महिन्यांत अन्य पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आदींनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अद्यापही पक्ष प्रवेशाची सत्रे सुरूच आहेत. पक्षातील सदस्य संख्या वाढीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणीवरही भर देण्यात येत आहे.

मुंबईत मंगळवारी तब्बल २९ हजार माथाडी कामगारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. भाजपच्या विस्तारासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेचे नेते संजय (बापू) निकम आणि पोपटराव पाटील यांच्याशी चर्चा सुरू होती. माथाडी कामगार युनियनमधील तब्बल २९ हजार कामगारांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.