मुंबई : सोन्याच्या दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. मात्र दोन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. घाटकोपर पोलिसांकडून शुक्रवारी रात्री परिसरात गस्त सुरू होती. यावेळी परिसरात जवाहिराच्या मोनालीसा ज्वलर्स या दुकानाबाहेर पोलिसांना काहीजण संशयास्पद हालचाली करीत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी यापैकी तिघांना ताब्यात घेतले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी पोबारा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मुंबई : मोटरमनचे असहकार आंदोलन मागे

ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याजवळ दरोडा घालण्यासाठी लागणारी हत्यारे सापडली असून पोलिसांनी ती जप्त केली. राजेश कदम (३८), महावीर कुमावत (३६) आणि हापुराम राज पुरोहित (२२) अशी या आरोपींची नावे असून तिघेही ठाणे परिसरातील रहिवासी आहेत. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात राज्यभरात २० ते २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 3 robbers arrested by ghatkopar police who were preparing for robbery on jewellery shop mumbai print news css