मुंबई : सांताक्रुझ येथे महिलेच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपी व मृत महिलेमध्ये प्रेमसंबंध होते. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. पण वैद्यकीय अहवाल व तपासात महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मरियम बीबी (३३) असे मृत महिलेचे नाव असून ती लोटस इमारतीच्या बांधकाम ठिकाणावर राहत होती. तिच्यासोबत आरोपी शहाबुद्दीन नजरूल गाजी (३०) राहत होता. आरोपीने १८ सप्टेंबरला मरियमचे तोंड उशीने दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तो काहीही न सांगता तेथून निघून गेला. तात्काळ महिलेला कुपर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली होती.

हेही वाचा : विधानपरिषदेतील सेना आमदारांविरोधातील याचिका सुनावणीत संदिग्धता; ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा

पण संशयीतरित्या महिलेचा मृत्यू व त्यानंतर तिच्या सोबत राहणारा गाजी गायब झाल्यामुळे पोलिसांना हत्येचा संशय होता. वैद्यकीय तपासणीत महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून गाजीला राहत्या परिसरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 30 year old man arrested in santacruz woman murder case mumbai print news css