मुंबई : दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरमधील महिला प्रसाधनगृहात ३५ वर्षीय महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रमाशंकर गौतम ऊर्फ संदीप पांडे (२१) याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. गंभीर बाब म्हणजे पीडित महिलेने त्याला विरोध केला असता त्याने तिचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘अमित शहा यांनी निश्चित करूनही उमेदवारी का रखडली?’ नाशिकमधून माघारीची छगन भुजबळ यांची घोषणा

रमाशंकर हा शेजारच्या इमारतीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. तक्रारदार महिला वकील आहेत. पीडित महिला गुरुवारी कोर्ट परिसरातील एका शॉपिंग सेंटरमधील महिला प्रसाधनगृहात गेली होती. त्यावेळी एक व्यक्ती महिला प्रसाधनगृहात उपस्थित होता. महिला प्रसाधनगृहात काय करत आहे, असा प्रश्न तिने विचारताच तो घाबरला व तेथून पळून गेला. त्यानंतर तो पुन्हा प्रसाधनगृहात घुसला आणि विनयभंग केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 35 year old woman molested in a toilet of a shopping center at south mumbai mumbai print news css