मुंबई: महानगरपालिकेकडून देवनार कचराभूमी परिसरात बसविलेल्या ३९ दिव्याच्या खांब्याची आज्ञात व्यक्तीने चोरी केली. ही बाब लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई शहरातील सर्वात मोठी कचराभूमी म्हणून देवनार कचराभूमी ओळखली जाते. गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात ही कचराभूमी आहे. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडल्या होत्या. रात्रीच्या वेळी कचराभूमीतील कचऱ्याला आग लावण्यात येत असल्याचा पालिकेला संशय होता. त्यामुळे पालिकेने काही वर्षांपूर्वी संपूर्ण कचराभूमी परिसरात सौर ऊर्जेवर आधारित दिवे बसविले होते. या परिसरात एकूण २१० दिव्याचे खांब आहेत. मात्र गेल्या काही महिन्यात यापैकी ३९ दिव्यांचे खांब अज्ञात चोरांनी चोरल्याचे निदर्शनास आले आहे. तर काही ठिकाणी त्याची बॅटरीही चोरण्यात आली आहे.

दोन महिन्यांपूर्वी विजेच्या खाबांची तपासणी करताना येथील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. याप्रकरणी त्यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत शिवाजी नगर पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 39 electric pole stolen from deonar dumping ground mumbai print news css