मुंबई : गेल्या चार महिन्यांत पश्चिम रेल्वेवरील लोकल, मेल/एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन आणि विशेष रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करून ५७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. यामध्ये मुंबई उपनगर विभागातून दंडापोटी वसूल करण्यात आलेल्या १७.३९ कोटी रुपयांचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते जुलै या कालावधीत तिकीट तपासणी करून ५७ कोटी रुपये दंड वसूल केला. जुलै २०२४ मध्ये आरक्षित न केलेले सामान घेऊन जाणाऱ्या १.२२ लाख विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करून ५.२० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यात आले. विनातिकीट प्रवास करणाऱ्या १७ हजार ४०० प्रवाशांकडून ६० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.