मुंबई : गेल्या आठवड्यात रविवारी संध्याकाळनंतर मुंबईत पडलेल्या पावसामुळे तब्बल ३० हून अधिक ठिकाणी पाणी साचल्याचे आढळून आले आहे. या ३० ठिकाणांचा आढावा घेऊन यापैकी नवीन ठिकाणे किती, जुनी किती याचा अभ्यास पालिका प्रशासनाने सुरू केला आहे. दरम्यान, रविवारच्या पावसात विक्रोळीतील छोटे नाले साफ न केल्यामुळे पाणी तुंबल्याचे आढळून आल्याने संबंधित कंत्राटदाराला २५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात रविवारी मोसमी पावसाचे मुंबईत आगमन झाले. पहिल्याच दिवशी रविवारी संध्याकाळी मुंबईत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. रात्री ८ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत मुंबईत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला. त्यातच दिवशी मध्यरात्री १.५५ वाजता समुद्राला मोठी भरती आली होती. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर फिरू लागल्या होत्या. शहर भागात अनेक ठिकाणी बैठ्या घरांत पाणी साचले होते. त्यामुळे पहिल्याच पावसात पालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरल्याची टीकाही झाली. या पहिल्या पावसानंतर पालिका प्रशासनाने मुंबईत कुठेकुठे पाणी साचले त्याची माहिती गोळा केली असून त्यावर अभ्यास सुरू केला आहे. त्यानुसार रविवारच्या पावसात ३० हून अधिक ठिकाणी पाणी तुंबल्याचे आढळून आले आहे. तसेच यापूर्वीची पाणी तुंबणारी पारंपरिक ठिकाणे कोणती, सध्याच्या ठिकाणांमध्ये नवीन ठिकाणांची भर पडली आहे का याचाही अभ्यास सुरू करण्यात आला असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

हेही वाचा : मुंबई: मृत पोलीस व्यक्तीगत आयुष्यात नैराश्याने ग्रासलेला, मोबाइल चोरांनी विषारी इंजेक्शन दिल्याचा दावा खोटा

रविवारच्या पावसात बैठ्या घरांमध्ये पाणी तुंबण्याच्या तक्रारी आल्या होत्या. बहुतांशी रस्त्याच्या कडेची भूमिगत गटारे साफ न केल्यामुळे अशा तक्रारी येतात. त्यामुळे त्यादृष्टीनेही उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिथे जिथे पाणी भरले त्या परिसरातील नालेसफाईचा पुन्हा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी ज्या ३० ठिकाणी पाणी भरले त्यात जर नवीन ठिकाणे असतील तर त्यामागचे कारण काय त्याचा आम्ही अभ्यास करू. त्या ठिकाणी तातडीची उपाययोजना म्हणून पंप बसवणे किंवा दूरगामी उपाय काय करता येतील त्याचा अभ्यास करू, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत पावसाचे पाणी तुंबण्याची पारंपरिक ३५० ठिकाणे होती. पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवल्यामुळे त्यापैकी आता सुमारे ९० ठिकाणे शिल्लक असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : शाळेची पहिली घंटा वाजली…

कुठे कुठे पाणी भरले

शहर भाग – दादर टीटी, हिंदमाता, हिंदू कॉलनी, लालबाग, वरळी, परळ, शिवडी ते वडाळा

पूर्व उपनगर – विक्रोळीत टागोर नगर, साकीनाका, मुलुंड, भांडूप, विद्याविहार

पश्चिम उपनगर – दहिसर चेक नाका, अंधेरी, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, मालाड

हेही वाचा : मतमोजणी केंद्रात मोबाइल नेल्याप्रकरणी उमेदवाराच्या प्रतिनिधीसह दोघांविरोधात गुन्हा, एक आरोपी नवनिर्वाचित खासदाराचा नातेवाईक

पावसाची प्रतीक्षा

पहिल्याच पावसात पाणी साचल्याच्या तक्रारी आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सर्व यंत्रणांना त्या त्या ठिकाणापासून ५० मीटर परिसरातील छोटे नाले, मोठे नाले यात काही कचरा अडकला आहे का याची तपासणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. उपाययोजना यशस्वी आहेत का पाहण्यासाठी अजून एक-दोनदा पाऊस पडल्यानंतरच समजू शकेल. यामध्ये काही पारंपरिक ठिकाणे आहेत का नवीन ठिकाणे आहेत याचा अभ्यास करून त्यानुसार आम्ही लवकरच कार्यपद्धती निश्चित करू.
अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त