मुंबई : बोरिवली येथील ९ व १० वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांच्या पित्याला अटक केली आहे. २०१९ पासून हा प्रकार सुरू असल्याचे मुलींच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ४० वर्षीय आरोपी २०१९ पासून पीडित मुलींवर अत्याचार करीत होता. त्याला विरोध केला असता आरोपीने पत्नीला मारहाण केली. अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळून मुलींच्या आईने याप्रकरणी बोरिवली पोलिसांकडे तक्रार केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ७५ वर्षीय वृद्धाची ११ कोटींची सायबर फसवणूक, नामांकीत ब्रोकरच्या नावाने बनावट मोबाइल ॲप

त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (एफ), ६४ (२) (एम), ११५ (२), ३५१ (२) सह पोक्सो कायदा कलम ६ व १० अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस पथकाने आरोपी पित्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.