लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः ट्रॉम्बे येथील चिताह कॅम्प परिसरात नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक केली. गंभीर बाब म्हणजे आरोपीला यापूर्वीही अशाच प्रकारच्या विनयभंगाच्या प्रकरणात अटक झाली होती. त्याप्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपीने पुन्हा विनयभंगाचा गुन्हा केला.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
Abdul sattar latest news in marathi
मंत्री सत्तार यांच्या संस्थेच्या २३ मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा, निवडणूक कामात हलगर्जीपणा
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी

पीडित मुलगी इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत असून आई आणि चार भावंडांसोबत ती ट्रॉम्बे परिसरात राहते. तिचे वडील परदेशात कामाला आहेत. आरोपी साजिदली हैदर शेख याने १२ एप्रिल रोजी रात्री मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलगी दुकानातून घरी जात असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर मुलीने आरोपीतच्या तावडीतून स्वतःची सुटका केली.

हेही वाचा… बारसू रिफायनरीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

घडलेल्या प्रकारामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. मुलीचे कुटुंब २४ एप्रिल रोजी रात्री जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेले. त्यावेळी मुलगी अस्वस्थ असल्याची शंका तिच्या आईला आली. तिने आणि मुलीच्या मोठ्या बहिणीने पीडितेला विश्वासात घेतले आणि विचारणा केली. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची माहिती घेतली. त्यानंतर पीडित मुलीला आरोपीचे छायाचित्र दाखवले. त्यावरून पीडित मुलीने आरोपीला ओळखले.

हेही वाचा… “एकीकडं राज्यातील प्रकल्प गेले म्हणून ओरडायचं अन्…”, उदय सामंतांची ठाकरे गटावर टीका; म्हणाले, “बारसूबाबत राज ठाकरेंना…”

पोलिसांनी आरोपीला दोस्ती हॉटेलजवळील एका ठिकाणाहून अटक केली. पीडितेनेही त्याच्या छायाचित्रावरून त्याची ओळख पटवली. आरोपीनेही गुन्हा कबूल केला. आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (विनयभंग), ३५४ अ (लैंगिक छळ) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ८ (लैंगिक अत्याचार) आणि १२ (लैंगिक छळ) अंतर्गत अटक करण्यात आली. यापूर्वी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. तो जामिनावर बाहेर असून त्याने आता अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली आहे. समुपदेशनाद्वारे या धक्क्यातून तिला बाहेर काढण्यासाठी पोलीस मदत करीत आहेत.