मुंबई : पोक्सो गुन्ह्यांतील आरोपीने कुलाब्यातील सत्र न्यायालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी कुलाबा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला सध्या आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुलाबा येथे कोर्ट रूम ३३ येथे आरोपीला बुधवारी आणण्यात आले होते. सुनावणी झाल्यानंतर कोर्टरूम बाहेरील मोकळ्या जागेत उभा असताना आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा ताब्यात घेण्यात आले. आरोपीला सध्या आर्थररोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. महिला पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २६२ अंतर्गत अटकेला प्रतिकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात २०२३ मध्ये विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता. त्याच्या सुनावणीसाठी त्याला न्यायालयात आणण्यात आले होते. त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai accused attempt to abscond from colaba session court case registered against him mumbai print news css