मुंबई : सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारफेऱ्या आणि प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांच्या मतदारसंघातील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. मात्र, या प्रचाराच्या धामधुमीत काहीसा विरंगुळा म्हणून ठाकरे बंधू खेळामध्ये रमलेले पाहायला मिळाले. वरळी विधानसभा परिसरात प्रचार करत असताना आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट आणि अमित ठाकरे यांनी प्रभादेवी – दादर येथील समुद्रकिनारी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे वरळी विधानभेतून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे हे दादर – माहिम विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या दोन्ही मतदारसंघात मराठी भाषिक जनतेसह तरुण मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे, मतदारसंघातील नागरिकांची भेट घेण्यासह तरुणाईमध्ये मिसळण्यावर ठाकरे बंधूंनी भर दिलेला पाहायला मिळत आहे. यावेळी, नागरिकांशी संवादही साधला जात आहे. यंदा आदित्य यांच्यासमोर मनसेचे संदीप देशपांडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांचे आव्हान आहे. राज्यभरातील विविध मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करत असताना आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) स्वतःच्या वरळी मतदारसंघात प्रचार केला. यावेळी, त्यांनी वरळी, महालक्ष्मी, सातरस्ता, डिलाईल रोड आणि लोअर परळ हा परिसर पिंजून काढला. प्रचारादरम्यान काहीसा विरंगुळा म्हणून त्यांनी डिलाईल रोड परिसरात तरुणाईमध्ये मिसळत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यासंदर्भात ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार सुनील शिंदे यांनी समाजमाध्यमांवर चित्रफित टाकून ‘वरळीत विकासाचा षटकार मारणार; महाराष्ट्रद्रोह्यांना क्लीन बोल्ड करणार’ असे कॅप्शनही लिहिले.

women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा : प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल

दरम्यान, अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान प्रभादेवी – दादर येथील समुद्रकिनारी स्थानिक मुलांसोबत मनसोक्तपणे फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला होता. माझ्यासाठी फुटबॉल हा नेहमीच उर्जा देणारा खेळ आहे, अशी भावना अमित यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली. तसेच, दादर – माहिम मतदारसंघातील समुद्रकिनाऱ्यांचा कायापालट करून त्याठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर अलीकडेच त्यांनी जय फाऊंडेशनतर्फे आयोजित दादर चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेत पत्नी मितालीसह सहभाग घेतला होता. त्यांनी यासंदर्भात समाजमाध्यमांवर पोस्ट करत ‘स्वच्छ समुद्र किनारा; आपली जबाबदारी, स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी सोबत आहे अमित’ असेही लिहिले. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या अमित ठाकरे यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत आणि शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांचे आव्हान आहे. दादर – माहिम आणि वरळी या दोन्ही विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे, कोण क्लीन बोल्ड होणार? आणि कोण विजयी गोल मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Story img Loader