मुंबई : अग्निवीर प्रशिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची गंभीर घटना मालाड येथे घडली. नौदलाच्या आयएनएस हमला येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. अपर्णा नायर (२०) असे मृत तरूणीचे नाव आहे. ती अग्निवीर प्रशिक्षण घेण्यासाठी मालवणी येथील आयएनएस हमला येथे आली होती. तेथील राहत्या खोलीमध्ये तीने गळफास लावून आत्महत्या केली. नौदलाच्या डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याबाबतची माहिती मालवणी पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून तपासणी केली. त्यात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीबाबत अनिश्चितता

तरूणीने खोलीतील चादरीच्या साह्याने गळफास घेतला असून प्राथमिक तपासणीत प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणाची माहिती मृत तरूणीच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai agniveer trainee 20 year old girl commits suicide mumbai print news css