मुंबई : चेंबूर येथे शिवीगाळ केली म्हणून जाब विचारला असता आरोपीने केलेल्या मारहाणीत २६ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपीला चेंबूर येथील आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अफजल बसरल अली शेख (२६) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो चेंबूर विष्ण नगर परिसरात राहतो. विष्णूनगर परिसरात रविवारी पत्ते खेळत होते. त्यांच्याकडे शेखने पाहिले. त्याचा राग आल्यामुळे जलालुद्दीन शाह(४६) याने शेखला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेखला मारहाण करण्यास सुरूवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पहाडी गोरेगावमधील पीएमएवाय योजनेतील घरांवर मेट्रो उपकराचा भार, एक हजार मुद्रांक शुल्कासह एक टक्के कर भरावा लागणार

त्याने एक ठोसा छातीवर मारल्यामुळे शेख खाली कोसळला व जमिनीवर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे बेशुद्ध पडलेल्या शेखला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून शेखला मृत घोषित केले. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी जलालुद्दीनला अटक केली. आरोपी शेखचा भाऊ साबुद्दीने शेख याच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला तो राहत असलेल्या परिसरातून तात्काळ अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai at chembur 26 year old man murdered after abused mumbai print news css