मुंबई : घरात एकट्या असलेल्या तरुणीला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन शेजारी राहणाऱ्या दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूळची पालघर येथे राहणारी १९ वर्षीय पीडित तरुणी ही तिच्या वडिलांकडे चेंबूर येथे आली होती. ती १७ नोव्हेंबरला घरात एकटीच असताना शेजारी राहणारा ३० वर्षीय आरोपी तिच्याकडे स्वयंपाकाची काही सामग्री मागण्यासाठी आला होता. तरुणीची त्याच्याशी ओळख असल्याने दोघेही घरात गप्पा मारत होते. त्यावेळी आरोपीने तिला शितपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर दुसऱ्या एका मित्राला बोलावून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

हेही वाचा : तमिळनाडूत पालींच्या दोन नव्या प्रजाती सापडल्या

तरुणी शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिने याबाबत चेंबूर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai at chembur a young girl gang raped by two people by giving her medicine in soft drinks mumbai print news css