मुंबई: लोकलच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या एका प्रवाशाच्या हातावर फटका मारून त्याचा मोबाइल लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री चुनाभट्टी रेल्वे स्थानकदरम्यान घडली. या घटनेत प्रवाशाच्या हाताला दुखापत झाली असून वडाळा लोहमार्ग पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. कुर्ला परिसरात वास्तव्यास असलेले विनायक सोनगेकर (२५) शनिवारी रात्री १२ च्या सुमारास सानपाडा येथून चुनाभट्टीला जात होते.

हेही वाचा : राज्यात नव्या वर्षात २७०० जणांना करोनाची बाधा, ‘जे.एन.१’बाधित रुग्णांची संख्या ६६६ वर; २१ रुग्णांचा मृत्यू

स्थानक जवळ आल्यामुळे ते लोकलच्या दरवाजात उभे राहून मोबाइलवर बोलत होते. त्याच वेळी अचानक विनायक यांच्या हातावर अज्ञात व्यक्तीने फटका मारला आणि त्यांचा मोबाइल पळवला. यामुळे विनायक यांच्या हाताला दुखापत झाली. चुनाभट्टी रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर येथील पोलिसांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी आज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून विनायक यांच्यावर हल्ला करून मोबाइल चोरणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Story img Loader