मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकात शुक्रवारी तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होती. सकाळच्या सुमारास हा बिघाड झाल्याने, चर्चगेटकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

बोरिवली येथे पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने काही वेळासाठी लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवासी गोंधळून गेले. बिघाडाची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पॉईंट बिघाड दुरुस्त केला. मात्र, या बिघाडामुळे लोकल सेवा खोळंबली. यामुळे वातानुकूलित लोकल आणि सामान्य लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. तर, दुपारपर्यंत लोकल सेवा विलंबाने धावत होती. दरम्यान, बोरिवली येथील पॉईंट बिघाड त्वरित दुरुस्त करून लोकल सेवा पूर्ववत केली, असे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… मुंबई : गिरणी कामगार पात्रता निश्चितीच्या विशेष अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

हेही वााचा… वरळीतील प्रस्तावित वाहनतळाची क्षमता वाढवणार, चार वर्षांत भूमिगत वाहनतळ बांधून पूर्ण करणार; २१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित

सकाळपासून पश्चिम रेल्वेच्या लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहचण्यास विलंब झाला. – शुभम मिश्रा, प्रवासी

मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडलेच नाही

गुरुवारी सायंकाळी ७.५६ च्या कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलचे दरवाजे नाहूर येथे उघडले नाही. तर, फलाटाच्या विरुद्ध दिशेचे दरवाजे उघडले. त्यामुळे प्रवाशांना चढता आणि उतरता आले नाही. फलाटाच्या विरुद्ध दिशेचे दरवाजे उघडल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले.

Story img Loader