मुंबई : गणेशोत्सवानंतर पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव – कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामांनी पुन्हा वेग घेतला आहे. या कामासाठी सोमवारपासून सलग ब्लॉक मालिका सुरू झाली आहे. सोमवार, मंगळवारी मध्यरात्री साडेसहा तासांचा ब्लाॅक घेऊन पायाभूत कामे करण्यात आली. तर, बुधवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ४.३० तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
हेही वाचा : मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला १९ ऑक्टोबरपासून सुरुवात
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ब्लाॅक कालावधीत सर्व अप जलद मार्गावरील लोकल बोरिवली – गोरेगाव/अंधेरी स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर धावतील. या ब्लाॅकमुळे काही अनेक लोकल रद्द करण्यात येतील. तसेच काही लोकल अंशत: रद्द करण्यात येतील.