मुंबई : लग्नास नकार दिला म्हणून ३० वर्षीय तरूणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्याने लोखंडी सळीने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार मालाड पूर्व येथे घडला. याप्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा आरोपीविरोधात दाखल केला आहे. आरोपी पूर्वीपासून तरूणीला त्रास देत होता. पीडित तरूणी मालाड पूर्व येथील रहिवासी असून शिक्षिका आहे. ती खासगी संगणक अभ्यासवर्गात शिकवते. आरोपी चमन ऊर्फ मोहम्मद हारून इद्रीस (२५) पीडित तरूणीवर एकतर्फी प्रेम करत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित महिला शनिवारी अभ्यासवर्गाला जात असताना आरोपीने पीडित तरूणीला लग्नबाबत विचारले. आरोपीच्या मागणीला तिने नकार दिला असता आरोपीने हातातील लोखंडी सळीने तिच्यावर हल्ला केला. त्यात तरूणीच्या डोक्याला, डाव्या हातात व कमरेला गंभीर दुखापत झाली. तरूणीवर शताब्दी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : पत्नीला ‘सेकंड हॅण्ड’ म्हटल्याने न्यायालयाने पतीला ठोठावला तीन कोटींचा दंड

आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून तरूणीला लग्नासाठी विचारत होता. त्यावेळीही तरूणीने त्याला नकार दिला होता. आरोपी लोखंडी सळी बरोबर्वघेऊन आल्यामुळे हा हल्ला पूर्व नियोजीत होता. याप्रकरणी तरूणीच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, विनयभंग अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai attack on a 30 year old woman after she refuse to marry mumbai print news css