मुंबई: भारतामध्ये बेकायदा वास्तव्यास असल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेने सहार पोलीस ठाण्यातून पलायन केल्याचा गंभीर प्रकार घडला. महिला शौचालयात गेली होती, तेथून तिने पलायन केल्याचे उघड झाले. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. महिला पोलीस शिपाई ललीता कोते (३५) यांच्या तक्रारीवरून सहार पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवि कलम २२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांगलादेशी नागरिक कविता बेगम मोहम्मद शाह आलम मिया (३०) हिला बनावट कायदपत्रे तयार करून बेकायदेशिररित्या भारतात राहिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४६५, ४६८, ४७१, ४२० व पारपत्र कायदा कलम १२ व परदेशी नागरिक कायदा कलम १४ (अ) (ब) अंतर्गत अटक करण्यात आली होती. तिला सोमवारी तिसऱ्या मजल्यावरील महिला अंमलदार कक्षामध्ये ठेवण्यात आले होते.

misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…
Google Map News Assam police
Assam Police : आसाम पोलीस छापा मारायला निघाले अन् गुगल मॅपमुळे पोहोचले नागालँडला; पुढे घडलं असं काही की सर्वांनाच बसला धक्का
Mumbai Crime News
Mumbai Crime News : चोरी करायला काहीच मिळालं नाही म्हणून महिलेचं चुंबन घेऊन पळाला चोर, मुंबईतल्या मालाडमधली घटना
Parents Seeking Abortion, Abortion, High Court,
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य, उच्च न्यायालयाची टिप्पणी
man sexually assaulted girl , Mumbai, sexual assault on girl,
मुंबई : पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत
mobile toilets burnt loksatta news
मुंबई : ॲण्टॉप हिल येथे दहा शौचालये जाळली, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

हेही वाचा : सिद्धिविनायक मंदिर न्यासाचं अध्यक्षपद सोडल्यानंतर आदेश बांदेकरांची पोस्ट, “२०१९ चा अंगारक चतुर्थीचा तो दिवस…”

ती सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास शौचालयात गेली. तेथून नजर चुकवून तिने पलायन केले. कोते व तेथील महिला पोलीस शिपाई हिरेमठ यांनी तपासणी केली असता ती कोठेच सापडली नाही. त्यामुळे आरोपी महिला पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनीही सर्वत्र तपासणी केली असता ती महिला सापडली नाही. अखेर यासंदर्भात सहार पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पलायन केल्याप्रकरणी बांगलादेशी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचा शोध सुरू आहे.

Story img Loader