मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस दाखल झाल्या. मात्र, मुंबईतील रस्त्यांमुळे या बसचे प्रचंड नुकसान होत आहे. या बसचा खालील भाग आणि रस्त्यामधील उंची कमी आहे. त्यामुळे रस्त्यांवरील गतिरोधकावरून जाताना बस खालून घासल्या जात आहेत. तसेच गतिरोधकावरून बस चालवणे चालकांसाठीही जिकिरीचे ठरत आहे.

लंडनच्या धर्तीवर बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित दुमजली बस फेब्रुवारी २०२३ मध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली. मात्र गाडीला गतिरोधकाचा जोरदार दणका बसत आहे. त्यामुळे बसच्या मागील बाजूचा काही भाग आणि मधील भाग दबला गेल्याचे निदर्शनास आले आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक ए- ११५ वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पाॅंईट दरम्यान सुरू आहे. तसेच अन्य मार्गावरील देखील ही बस सेवा सुरू आहे. मात्र मुंबईतील असमान गतिरोधकामुळे बसचे नुकसान होत आहे. बेस्टच्या चालकांकडून ही अशा पद्धतीच्या असमान गतिरोधकाबाबत तक्रारी येत आहेत. प्रवाशांनी भरलेली बस गतिरोधकांवरून नेतानाच बेस्ट बस चालकांची प्रचंड दमछाक होते.

friends
वेड्या दोस्तीतील शहाणीव…
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
shreyas Iyer buy apartment in Mumbai
Shreyas Iyer : श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईने मुंबईतील वरळी भागात खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट; किंमत ऐकून थक्क व्हाल!
central railway cancelled 10 ac local service
मध्य रेल्वेचा ‘पांढरा हत्ती’ प्रवाशांसाठी त्रासदायक; वातानुकूलित लोकलच्या दहा फेऱ्या रद्द
Task Fraud, Retired intelligence officer, Mumbai,
मुंबई : सेवानिवृत्त गुप्तवार्ता अधिकाऱ्याचे टास्कच्या नादात खाते रिकामे, तीन दिवसांत गमावले ११ लाख
iPhone 16 First Sale Mumbai Store Crowd Latest Marathi News
iPhone 16 First Sale : VIDEO : भारतात आजपासून ‘आयफोन १६’च्या विक्रीला सुरुवात; खरेदीसाठी मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची झुंबड
Metro 3, Aarey to BKC Metro, Dussehra,
मेट्रो ३ : आरे ते बीकेसी टप्पा दसऱ्यापूर्वी वाहतूक सेवेत, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
4th admission round of B.Sc Nursing course starts from 17th September
बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या चौथ्या प्रवेश फेरीला १७ सप्टेंबरपासून सुरुवात

हेही वाचा : मुंबई: सागरी किनारा मार्ग प्रकल्प रखडवणाऱ्या कंत्राटदाराला ३५ कोटींचा दंड, माहिती अधिकारातून बाब उघड

जुन्या दुमजली बसच्या तुलनेत या नव्या विद्युत वातानुकूलित दुमजली बसची रचना लो-फ्लोअर पद्धतीची आहे. त्यामुळे प्रत्येक गतिरोधकावर बस जपून चालवण्याचे आव्हान हे बेस्ट चालकांसमोर आहे. बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून हा प्रश्न असून, बेस्ट उपक्रमाकडून काही ठोस पावले उचलली गेली नसल्याचे निदर्शनास येत आहे.