मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विरार-वैतरणा दरम्यान पूल क्रमांक ९० वर स्लॅबद्वारे स्टील गर्डर बदलण्यासाठी १ जूनच्या मध्यरात्री १२.२० ते २ जून रोजी सकाळी ६.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या रद्द, तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.
२ जून रोजी रद्द झालेल्या गाड्या
- विरारहून पहाटे ५.३५ वाजता सुटणारी विरार-डहाणू रोड लोकल
- डहाणू रोडवरून सकाळी ७.१० वाजता सुटणारी डहाणू रोड – चर्चगेट लोकल
- विरार – सांजन मेमू
- वांद्रे टर्मिनस – भुसावळ एक्स्प्रेस
- भुसावळ – वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस
२ जून रोजी पहाटे ५.२५ वाजता डहाणू रोडवरून सुटणारी डहाणू रोड – पनवेल लोकल डहाणू रोड आणि वसई रोड स्थानकांदरम्यान अंशतः रद्द करण्यात येणार आहे. वसई रोड आणि पनवेल स्थानकांदरम्यान लोकल धावेल. तसेच काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात १५ ते ३० मिनिटांचा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.