लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सागरी किनारा मार्गालगत भराव टाकून तयार करण्यात आलेल्या जमिनीवर हिरवळ तयार करण्यात येणार असून विविध नागरी सुविधा देण्यात येणार आहेत. या कामासाठी पालिकेने नगर रचनाकार आणि तज्ज्ञांकडून सूचना मागवल्या आहेत. भराव भूमीपैकी तब्बल ७५ लाख चौरस फूट जागेवर उद्याने, जॉगिंग ट्रॅक, शौचालये, वाहनतळ अशा सुविधा देण्यात येणार आहेत.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

पालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गासाठी समुद्रात भराव टाकून १११ हेक्तर जमीन तयार करण्यात आली आहे. उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रापैकी २५ ते ३० टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. उर्वरित सुमारे ७० ते ७५ टक्के क्षेत्रात म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फूट परिसराचा उपयोग हा हिरवळ म्हणजेच लँडस्केपिंग, विविध नागरी सुविधांसाठी करण्यात येणार आहे. त्यात प्रसाधन गृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरु उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठी उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमीगत पदपथ, जेट्टी इत्यादींचा समावेश असेल.

हेही वाचा…. VIDEO: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर १०० वर्षांपूर्वी काळ्या पैशाविषयी म्हणाले होते की…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

याव्यतिरिक्त १ हजार ८५६ एवढी वाहन क्षमता असलेल्या ३ भूमीगत वाहनतळांचाही यात समावेश असणार आहे. ‘लॅण्डस्केपिंग’ प्रत्यक्ष स्वरुपात आकारास येण्यापूर्वी ते अधिकाधिक सुविधापूर्ण करण्याच्यादृष्टीने पालिकेने नगररचनाकार, वास्तुविशारद व तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी १०० तज्ज्ञांची परिषद आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा…. भारताच्या चित्रपटसृष्टीची ओळख म्हणजेच मराठी चित्रपट – सुबोध भावे

दक्षिण मुंबईतील श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते राजीव गांधी सागरी सेतूच्या (वरळी वांद्रे सी लिंक) वरळी बाजूच्या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा ‘मुंबई सागरी किनारा रस्ता’ तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी १ कोटी ३ लाख ८३ हजार ८२० चौरस फुटांचे भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. त्यापैकी सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्रात म्हणजेच २८ लाख ५२ हजार २९५ चौरस फुटांमध्ये सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. उर्वरित ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फुटांमध्ये नागरी सुविधा बांधण्यात येणार आहेत.

भराव भूमीवर कोणत्या सुविधा ?

तीन भूमीगत वाहनतळ: या परिसरात ३ मोठे भूमीगत वाहनतळ बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी एक वाहनतळ महालक्ष्मी मंदिर व हाजीअली दर्गा यांच्याजवळ असेल. दुसरा वाहनतळ ‘अमर सन्स गार्डन’जवळ तर मोठ्या प्रमाणात शालेय सहली येणा-या वरळी डेअरी व वरळी सी-फेस येथे तिसरे वाहनतळ बांधण्यात येणार आहे. या तिन्ही वाहनतळांची एकूण वाहनक्षमता ही १ हजार ८५६ एवढी असेल. या भूमीगत वाहनतळाच्या छतावर उद्यान वा खेळाचे मैदान विकसित करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.

फुलपाखरु उद्यान: सागरी किनारा रस्त्याच्या बांधणीसाठी विविध शासकीय संस्थांची मंजूरी आवश्यक असते. त्यात केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने परवानगी देताना ‘बॉटॅनिकल बटरफ्लाय गार्डन’ सकारण्याची अट घातली आहे. त्यानुसार उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रात एक ‘फुलपाखरु उद्यान’ विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूदही करण्यात येत आहे.

जॉगिंग व सायकल मार्गिका : सागरी किनारा रस्त्यालगत स्वतंत्र ‘जॉगिंग ट्रॅक’ व ‘सायकल ट्रॅक’ बांधण्याचे प्रस्तावित आहे.

सागरी पदपथ (Promenade): मरीन ड्राईव्हप्रमाणे सागरी किनारा रस्त्यालगत ‘समुद्री पदपथ’ तयार करण्यात येणार आहे. हा मुंबईतील सर्वात मोठा ‘समुद्री पदपथ’ ठरणार असून तो सुमारे २० मीटर रुंद व साधारणपणे ७.५ किलोमीटर लांबीचा असेल. हा पदपथ समुद्राला जोडून व समुद्री किनारी मार्गालगत बांधला जाणार असून तो प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सागरी सेतू दरम्यान असणार आहे.

उद्याने व खेळांची मैदाने: सागरी किनारा रस्त्याच्या निमित्ताने उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रातही महापालिकेद्वारे उद्याने व मैदाने विकसित करण्यात येणार आहेत. त्यात लहानमुलांसाठी घसरगुंडी, सी-सॉ, झोके अशी खेळणीही असतील.

बसथांबे व भूमिगत पदपथ: सागरी किनारा रस्त्यालगत ८ ठिकाणी बसथांबे उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या बस थांब्यापर्यंत प्रवाशांना सहजपणे पोहचता यावे, यासाठी सागरी किनारा मार्गाखाली ‘भूमिगत पदपथ’ देखील तयार करण्यात येणार आहेत. या भूमिगत पदपथांमुळे सागरी किनारी रस्ता सहजपणे ओलांडणे शक्य होणार आहे.