मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या तीन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी सोमवारी पहाटे प्राप्त झाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. घटनेनंतर दोन विमाने मुंबई विमानतळावरच थांबवून त्यांची तपासणी करण्यात आली. तर न्यूयॉर्कला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाला दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. नियमानुसार विमानांची तपासणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई विमानतळावरील ६ ई१२७५ व ६ ई५७ या दोन इंडिगो कंपनीच्या विमानात तसेच न्यूयॉर्कला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या एआय ११९ विमानांमध्ये बॉम्ब असल्याचे दूरध्वनी विमानतळ प्राधिकरणाला प्राप्त झाले होते. त्याबाबत मुंबई पोलिसांना तसेच संबंधीत यंत्रणांना कळवण्यात आले. या माहितीनंतर तात्काळ बैठक घेऊन ६ ई१२७५ व ६ ई५७ दोन्ही विमाने मुंबई विमानतळावर थांंबवण्यात आली. तर एअर इंडियाचे विमाना न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघाले होते त्याच्या वैमानिकाशी संपर्क साधून विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. तेथे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढून विमानाची तपासणी करण्यात आली.

हेही वाचा : मुंबईहून निघालेलं एअर इंडियाचं विमान हवेत असतानाच मिळाली बॉम्ब ठेवल्याची धमकी; प्रवाशांमध्ये घबराट, विमान दिल्लीकडे वळवलं!

मुंबई पोलिसांनाही याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विमातळावर धाव घेतली. पण त्यापूर्वीच केंद्रीय सुरक्षा विभागाला याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी बैठक घेऊन तात्काळ कार्यवाही केली. विमानतळावर सुरक्षेच्यादृष्टीने योग्यती काळजी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai bomb threat in three flights two flights stopped in mumbai and one diverted to delhi mumbai print news css