मुंबईः शेतात सापडलेल्या गुप्तधनातील सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला आसाममधून अटक करण्यात सांताक्रूझ पोलिसांना यश आले. आरोपीकडून रोख २० लाख रुपये हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणात आणखी दोघांचा सहाभाग असल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपींनी अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का ? याचा पोलीस तपास करीत आहेत.

शफीकुल इस्लाम असे या आरोपीचे नाव असून तो आसामच्या बिहपूरीयामधील रहिवाशी आहे. आरोपीला २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणातील तक्रारदार सांताक्रूझ येथील व्यावसायिक आहेत. तक्रारदारांची डिसेंबर २०२२ रोजी आरोपी राजूअली कुदूसअलीशी ओळख झाली होती. सांताक्रूझ येथे इमारतीचे बांधकाम सुरू असून आरोपी तेथे मजूर म्हणून काम करीत होता. त्यानंतर तो व्यावसायिकाकडे कामाला लागला. एक महिना काम केल्यानंतर राजू आसाम येथील त्याच्या गावी निघून गेला. त्याने डिसेंबर २०२३ रोजी तक्रारदारांना दूरध्वनी करून मुंबईत येणार नसून गावीच शेती करणार असल्याचे सांगितले. त्याला शेतात काम करताना गुप्तधन सापडले आहे. त्यात एका सोन्याची लगड असून त्याचे वजन अडीच किलो असल्याचेही त्याने तक्रादारांना सांगितले. इतकेच नव्हे तर त्याने सोन्याच्या लगडीचे छायाचित्र व्यावासियाकाला पाठवले.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
Dawood t-shirt, Lawrence Bishnoi t-shirt,
दाऊद, लॉरेन्स बिष्णोईचे टीशर्ट विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल; महाराष्ट्र सायबर पोलिसांची कारवाई
three crores found in atm van
नालासोपार्‍यात एटीएम व्हॅन मध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये, गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
drug cartel kingpin lalit patil
चाकणमधील मेफेड्रोन प्रकरण;  खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ; अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक

हेही वाचा : वडील विरुद्ध मुलगा

व्यावसायिकाला ११ डिसेंबर रोजी कोलकाता येथे राजूसह त्याचे दोन मित्र भेटले. त्यांनी व्यावसायिकाला सोन्याची लगड दिली. त्यातील पाच मिलिग्राम तुकडा काढून त्यांनी एका सराफाकडून त्याची तपासणी करून घेतली. त्यावेळी सराफाने ते २२ कॅरेट सोने असल्याचे सांगितले. व्यावसायिकाचा विश्वास बसल्यामुळे त्याने २२ लाख रुपये देऊन सोन्याची लगड घेण्याचे मान्य केले. व्यवहार झाल्यानंतर व्यावसायिकाने पुन्हा सोन्याची तपासणीत केली असता ते खोटे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर राजूने दूरध्वनी स्वीकारणे बंद केले. व्यावसायिकाने राजू व इतर आरोपींविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आसाम येथून शफीकूलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याच्या मित्रांच्या साथीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून रोख २० लाख रुपये हस्तगत केले.