मुंबई : बारा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कीक बॉक्सिंग प्रशिक्षकाला मंगळवारी भायखळा पोलिसांनी अटक केली. आरोपीने दोन वेळा पीडित मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केला. १२ वर्षांची तक्रारदार मुलगी कीक बॉक्सिंग शिकण्यासाठी २२ वर्षीय आरोपीकडे यायची. माझगाव येथील एका इमारतीतील रिफ्युज एरियामध्ये आरोपी कीक बॉक्सिंगचे प्रशिक्षण द्यायचा. आरोपीने फेब्रुवारी ते २४ जून या काळावधीत पीडित मुलीला दोन वेळा थांबवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने नुकताच विरोध केला असता आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा: मुंबई : नव्या इमारतींची आयआयटीकडून तपासणी, ताबा घेतलेल्या म्हाडाच्या २०७ पैकी ९६ घरांमध्ये बदल

हा प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितला. आईने याप्रकरणी भायखळा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या (पोक्सो) अंतर्गत सोमवारी गुन्हा दाखल केला. त्यानंतर परळ येथील शिवडी नाका परिसरातील राहत्या घरातून आरोपीला पोलिसांनी अटक केली. आरोपी २२ वर्षांचा असून त्याने प्रशिक्षण देणाऱ्या इतर मुलींवर अत्याचार केला आहे का ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai byculla police arrested kickboxing coach for rape of 12 year old girl mumbai print news css