मुंबई : शीव परिसरात सोमवारी पहाटे एका चारचाकी गाडीला भीषण अपघात झाला. दुभाजकाला धडकल्यामुळे या गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. शीव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाजवळ असलेल्या गंगा विहार हॉटेलजवळ सोमवारी पहाटे साडेचार वाजता ही दुर्घटना घडली. शीवकडून दादरला जाणारी ह्युंदाई २० ही सीएनजी गाडी दुभाजकाला धडकली आणि गाडीने पेट घेतला. या गाडीत एकूण पाचजण प्रवास करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : मृतदेह पिशव्या गैरव्यवहार प्रकरणः माजी महापौर किशोरी पेडणेकर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल

अग्निशमन दलाला या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्याआधीच गाडीतील तिघांना स्थानिकांनी बाहेर काढून शीव रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत प्रेम वाघेला (१८) आणि अजय वाघेला (२०) या दोन तरुणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर हर्ष कदम (२०), रितेश भोईर (२५), कुणाल अत्तर (३३) हे तिघे जण जखमी असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.