मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : विद्याविहार – ठाणे स्थानकांदरम्यान

कधी : सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावतील.

हेही वाचा : मुंबई : व्ही. एन. देसाई रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामामुळे रुग्णांची गैरसोय

ट्रान्सहार्बर मार्ग

कुठे : ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरुळ/पनवेल लोकल सेवा बंद असतील.

हेही वाचा : Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणात तिघांना अटक, २६ लाखांची रोकड जप्त

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल गोरेगाव – बोरिवली स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. अंधेरी आणि बोरिवलीच्या काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

Story img Loader