मुंबई : मध्य रेल्वेवरील दौंड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम २९ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामकाजासाठी दौंड, दौंड यार्ड आणि दौंड ए केबिन व दौंड कॉर्ड लाइन येथे प्री-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्री – इंटरलॉकिंगचे काम २७ आणि २८ जुलै रोजी करण्यात येणार आहे. तसेच २९ जुलै रोजी सकाळी १०.४० ते १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४० वाजेपर्यंत एकूण ८० तास काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे.

हेही वाचा : आषाढीनिमित्त ९.५३ लाख भाविकांचा एसटी प्रवास, एसटीच्या तिजोरीत २८.९२ कोटी रुपयांची भर

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई

दौंड येथे ब्लाॅकमुळे २८, २९, ३० आणि ३१ जुलैची नांदेड पनवेल एक्स्प्रेस आणि २९, ३०, ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी पनवेल – नांदेड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. ३०, ३१ जुलै रोजी सिकंदराबाद – एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी दादर – साईनगर शिर्डी एक्स्प्रेस आणि १ ऑगस्ट रोजी साईनगर शिर्डी- दादर एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे. तर, या मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.