मुंबई : चेंबूर-जेकब सर्कल ‘मोनोरेल’ मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी आणि ‘मोनोरेल’ प्रकल्पास तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रकल्पात दहा नव्या गाड्या दाखल करण्याचा निर्णय घेतला. स्वदेशी बनावटीच्या पहिल्या ‘मोनोरेल’चे तीन डबे सध्या मुंबईतील वडाळा कारडेपोत दाखल झाले आहेत. तर शेवटचा एक डबा येत्या एक-दोन दिवसांत मुंबईत दाखल होतील. उर्वरित नऊ गाड्या डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने मुंबईत आणण्यात येतील. १० गाड्या सेवेत दाखल झाल्यास दर सहा मिनिटांनी एक गाडी धावेल. त्यामुळे प्रवासीसंख्येत वाढ होईल, असा दावा ‘एमएमआरडीए’ने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपनगरीय रेल्वे सेवा आणि बस सेवा नाही, अशा ठिकाणी ‘एमएमआरडीए’ने मोनोरेल सुरू केली. त्यानुसार चेंबूर-जेकब सर्कल दरम्यान ‘मोनोरेल’ मार्गिका उभारण्यात आली. मात्र पुढील मार्गिका, एकूणच ‘मोनोरेल’ प्रकल्प गुंडाळण्यात आला. त्यामुळे चेंबूर- जेकब सर्कल ही देशातील एकमेव मोनोरेल मार्गिका असून ती तोट्यात आहे. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर पहिल्यांदाच भारतात गाड्यांची बांधणीचा निर्णय घेऊन ‘एमएमआरडीए’ने ‘मेधा सर्वो ड्राइव्हज प्रायव्हेट लिमिटेड’ला ५९० कोटी रुपयांचे कंत्राट दिले.

हेही वाचा : मुंबईत काँग्रेसला गळती

जूनमध्ये पहिली गाडी

स्वदेशी बनावटीच्या दहा मोनोगाड्यापैकी पहिल्या मोनोरेल गाडीचे तीन डबे मुंबईत दाखल झाले आहेत. तर शेवटचा डबा एक-दोन दिवसात येणार असून त्यानंतर वडाळा कारडेपोत त्यांची जोडणी करण्यात येणार आहे. जोडणी पूर्ण झाल्यास मोनोरेल गाडीच्या चाचण्या घेण्यात येईल. त्यामुळे आचारसंहितेनंतरच ही गाडी सेवेत दाखल करण्यात येईल, असे ‘एमएमआरडीए’तील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai chembur to jacob circle monorail line 3 more made in india coaches mmrda mumbai print news css