मुंबई : वृद्धापकाळी किंवा रुग्णशय्येवर असताना कोणते उपचार करावेत किंवा करू नयेत याबाबतची इच्छा नागरिकांना आता आधीच नोंदवून ठेवता येणार आहे. भविष्यकाळातील वैद्याकीय उपचार पद्धतीबाबत हे निवेदन करण्याची सोय आता मुंबई महापालिकेने करून दिली आहे. इच्छुक नागरिकांना आपल्या वैद्याकीय निर्देशाची प्रत महापालिकेच्या सक्षम अधिकाऱ्याकडे जतन करता येणार आहे. त्याकरिता पालिकेने प्रत्येक विभागात एक याप्रमाणे २४ वैद्याकीय अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली आहे.
म्हातारपणात किंवा गंभीर आजारात एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची गंभीर झाल्यावर रुग्णालयात त्याच्यावर जीवरक्षक प्रणालीद्वारे उपचार सुरू ठेवले जातात. या परिस्थितीत हे उपचार थांबवावेत काय? याबाबत नातेवाईकांमध्ये संभ्रमावस्था असते. याबाबत व्यक्तीच्या सन्मानपूर्वक मृत्यू हक्काचा अपेक्षित हेतू साध्य करण्याकामी सर्वोच्च न्यायालयाने २४ जानेवारी २०२४ रोजी स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार, इच्छुक नागरिकांनी तयार केलेली ही प्रत स्थानिक प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका किंवा पंचायत समिती यांच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे जतन करण्यासाठी सुपूर्द करावयाची आहे. इच्छुक नागरिकांना भविष्यकालीन वैद्याकीय निर्देशाबाबत पत्र तयार करता यावे यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
हेही वाचा : विकासकामांच्या माध्यमातून मुंबईत आमूलाग्र परिवर्तन
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, भविष्यकालीन वैद्याकीय निर्देश दस्तऐवज संरक्षणामध्ये जतन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने स्थानिक पातळीवर २४ प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) वैद्याकीय आरोग्य अधिकारी यांची निष्पादित अधिकारी (कस्टोडियन) म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, सार्वजनिक आरोग्य खात्यातील जन्म – मृत्यू नोंदणी हाताळणारे सहायक आरोग्य अधिकारी आणि उप कार्यकारी आरोग्य अधिकारी यांची सहायक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या कार्यवाहीसाठी महानगरपालिकेच्या ँhttp:// www. mcgm. gov. in या संकेतस्थळावर निष्पादित व्यक्ती यांचे नाव, दूरध्वनी क्रमांक, ई – मेल आदी माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
मुंबई पालिकेकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, भविष्यकालीन वैद्याकीय निर्देश दस्तऐवज संरक्षणामध्ये जतन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने स्थानिक पातळीवर २४ प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) वैद्याकीय आरोग्य अधिकारी यांची निष्पादित अधिकारी (कस्टोडियन) म्हणून नियुक्ती केली आहे.