लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई: मुंबईत उन्हाच्या झळांची तीव्रता वाढली असून रखरखत्या उन्हाने हैराण झालेले नागरिक कोरड पडलेल्या घशाला थंडावा देण्यासाठी कृत्रिम शीतपेयांऐवजी उसाच्या रसाला अधिक पसंती देत आहेत. परिणामी, अत्यंत माफक दरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या उसाच्या रसासाठी रसवंतीगृहांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. अनेक जण निरनिराळ्या प्रकारच्या शीतपेयांनी आपली तहान भागवितात. असे असले तरी शरीरासाठी अधिक फायदेशीर असणारा उसाचा रस नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. चवीला अत्यंत मधुर व शीतल असणारा उसाचा रस कॅल्शियम, पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आदी विविध पोषक तत्वांचा ऊर्जास्रोत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध ब्रँड्स आणि चवीच्या कृत्रिम शीतपेयांमध्ये अत्यंत घातक द्रव्ये असतात. या शीतपेयांमुळे मुतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे, मधुमेह, स्थूलता आदी विविध आजार जडण्याची दाट शक्यता असते. शिवाय काही क्षणापुरते शरीराला थंडावा देणाऱ्या कृत्रिम शीतपेयांमध्ये अधिक प्रमाणात उष्ण घटक असतात. कोरोनाकाळानंतर आरोग्याच्या बाबतीत दक्ष असलेले नागरिक सध्या उसाच्या रसाला पसंती देऊ लागले आहेत.

हेही वाचा… “राष्ट्रवादीतील परिस्थितीला संजय राऊतच जबाबदार”, शरद पवारांच्या राजीनाम्यावरून संजय शिरसाटांचं टीकास्र; म्हणाले, “अजित पवार अन्…”

यंदा ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पूर्वी १०० किलो उसाची मागणी होती. मात्र, ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने ती आता २०० किलोवर गेली आहे. पूर्वी दिवसाला १५० ते २०० ग्राहक दुकानात येत होते. मात्र आता ग्राहकांची संख्याही वाढली असून ३०० ते ४०० ग्राहक उसाचा रस पिण्यासाठी येत असतात, असे दादरमधील रसवंतीगृहाचे मालक राजाराम पवार यांनी सांगितले.

हेही वाचा… मुंबई: माथाडी कामगारांसाठी आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त!

बाजारात इतर पारंपारिक पेयांनाही मागणी

पारंपारिक व नैसर्गिक पेयांचे महत्त्व जाणणारे ग्राहक उसाच्या रसाबरोबरच लिंबू, कोकम, आवळा सरबत, शहाळ्याचे पाणी आदी नैसगिर्क पेयांना पसंती देत आहेत. तसेच बाजारात ताक, पन्हे, लस्सी, पियुष, जलजिरा, विविध फळांचा रसचा आस्वादही ग्राहक घेत आहेत.