मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २६३ कोटी रुपयांच्या प्राप्तिकर गैरव्यवहाराप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्यासह तिघांविरोधात मंगळवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याशिवाय तीन कंपन्यांविरोधातही आरोपत्र दाखल्र केले आहेत. ईडीने नुकतीच याप्रकरणात चव्हाण यांच्या मुंबईतील सदनिका आणि इतर आरोपींच्या मालमत्तांसह एकूण १४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती.

याप्रकरणात राजेश बत्रेजा, पुरूषोत्तम चव्हाण, अनिरुद्ध गांधी व तीन कंपन्यांविरोधात मंगळवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणात नुकतीच ईडीने चव्हाण यांची मुंबईतील सदनिका, आरोपी राजेश बत्रेजा याची लोणावळा व खंडाळा येथील जमीन, अनिरुद्ध गांधींच्या कंपनीतील रक्कम, राजेश शेट्टीच्या विमा योजना, भूषण पाटील याच्या बँकेतील मुदत ठेवी अशा एकूण १४ कोटी दोन लाख रुपयांची मालमत्ता गोठवण्यात अथवा त्यांच्यावर टाच आणण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १८२ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे.

four arrested including ex corporator swapnil Bandekar in Rs 10 crore extortion case
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी; माजी नगरसवेक स्वप्निल बांदेकरसह चौघांना अटक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Fraud, cheap house, government quota,
सरकारी कोट्यातून स्वस्त दरात घरे देण्याच्या नावाखाली सुमारे २५ कोटींची फसवणूक, पुरुषोत्तम चव्हाणसह इतर आरोपीविरोधात गुन्हा
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
property dispute, Sumit Wankhade, Wardha SP, family
VIDEO : हे काय? डीआयजी तत्काळ हजर आणि दोन शिपाई निलंबित, ठाणेदार बदलीवर…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
Loksatta explained What are the consequences of the privatization of electricity substations in the state
विश्लेषण: राज्यातील विद्युत उपकेंद्रांच्या खासगीकरणाचे परिणाम काय?
ED seized property in bank fraud case
२२० कोटींच्या फसवणूक प्रकरणी ईडीकडून ७९ कोटींची मालमत्तेवर टाच

हेही वाचा : Mumbai’s First Underground Metro Line : मुंबईकरांनो, भूमिगत मेट्रोतून प्रवास करण्यासाठी सज्ज व्हा! ‘या’ तारखेपासून सुरू होणार सेवा; विनोद तावडेंकरून जाहीर

या प्रकरणात माजी वरिष्ठ कर सहाय्यक तानाजी मंडल अधिकारी, त्यांचे साथीदार भूषण पाटील, राजेश शेट्टी, राजेश बत्रेजा व चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. २००७-०८ आणि २००८-०९ या आर्थिक वर्षांसाठी बनावट परतावा जारी केल्याप्रकरणी अतिरिक्त महासंचालक (दक्षता)-४ सीबीडीटी यांनी लेखी तक्रारी केली होती. त्याप्रकरणी दिल्ली सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने केलेल्या तपासानुसार, १५ नोव्हेंबर २०१९ ते ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत अधिकाऱ्यांनी एकूण १२ बनावट टीडीएस परताव्यांद्वारे २६३ कोटी ९५ लाख ३१ हजार ८७० रुपयांचा गैरव्यवहार केला. ती रक्कम भूषण पाटील याच्या मालकीच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा झाली. ती रक्कम पुढे संबंधित इतर व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये, तसेच बनावट कंपन्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली. यापूर्वी याप्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी राजेश बत्रेजाने ही रक्कम इतरत्र वळवण्यास आरोपींना मदत केली.

हेही वाचा : मुंबई: विमानतळावरील ६०० पदांसाठी तोबा गर्दी

राजेश बत्रेजा आणि पुरुषोत्तम चव्हाण नियमितपणे संपर्कात होते, हवाला व्यवहार आणि गुन्ह्यातील रक्कम वळवण्याबाबात संबंधित संदेशही एकमेकांना केल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातील ५५ कोटी ५० लाख रुपये दुबईतून तीन बनावट कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आले. त्या कंपन्यांवर आरोपी अनिरुद्ध गांधीचे नियंत्रण असल्याचा आरोप आहे. आरोपी गांधीने मालाड येथील अंगडीयामार्फत रोख मागवली होती. ती रक्कम मंगेश व संजय यांना देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडी अधिक तपास करीत आहे.

Story img Loader