मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप संबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले असून याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. या कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचे यूएईमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले होते. या विवाह सोहळ्यासाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गंभीर बाब म्हणजे या विवाह सोहळ्यात सादरीकरण करण्यासाठी १४ चित्रपट कलाकार व गायकांनी हवालामार्फत रक्कम घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडीने याप्रकरणी मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने महादेव ऑनलाईन बेटींग ॲपशी सबंधित ठिकाणी छापे टाकले असून त्यात मुंबईसह भोपाळ, कोलकाता परिसरातील ठिकाणांचा समावेश आहे. छत्तीसगडमधील रहिवासी असलेले रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग ॲपचे प्रवर्तक असून या कारवाईमध्ये तब्बल ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आले असून अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी यांनी दुबईमधील लग्नात सादरीकरण केले होते.

हेही वाचा : मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्सना टाळे; १५ दिवसांत ७० हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

त्यामुळे तेही याप्रकरणात ईडीच्या रडावर आले आहेत. याशिवाय भारती सिंग, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम यांचीही नावे तपासात उघड झाली आहेत. संशयीत कलाकारांनी हवालामार्फत पैसे स्वीकारल्याचा संशय आहे. त्यांना याबाबत माहिती होती का याची पडताळणी करण्यासाठी यापैकी अनेकांवर ईडी लवकरच समन्य बजावणार आहे. योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रैकेट चालवले जात असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी १८ लाख रुपयांची रोख रक्कम आणि १३ कोटी रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने ईडीला सापडले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai enforcement directorate ed raid at 39 locations across the country property of rupees 417 crores seized tiger shroff sunny leone neha kakkar mumbai print news css
Show comments