मुंबई : एका तोतया डॉक्टरने गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करून दिल्याचा बनाव रचत वृध्द महिलेकडून लाखो रुपये उकळल्याची घटना अंधेरीत उघडकीस आली आहे. या तोतया डॉक्टरसह त्याच्या साथीदाराविरोधात या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी महिलेकडून सव्वा सात लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

ओळखपाळख नसलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या संपर्क क्रमांकावरून डॉक्टरशी संवाद साधत उपचार करून घेण्याचा प्रकार अंधेरीतील ६१ वर्षीय महिलेच्या अंगलट आला. डॉ. झफर मर्चंट हा तोतया डॉक्टर आणि त्याचा सहकारी विनोद गोयल यांनी मिळून २०२१च्या नोव्हेंबरमध्ये या महिलेची आणि तिच्या कुटुंबाची फसवणूक केली होती. मात्र तीन वर्षांनंतर मंगळवारी या प्रकरणी तक्रारदार महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

हेही वाचा:बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणः आणखी एका आरोपीला अटक

२०२१ मध्ये तक्रारदार महिला त्यांच्या आईला घेऊन दंत चिकित्सेसाठी गेल्या असताना तिथे त्यांची ओळख आरोपी विनोद गोयलबरोबर झाली. त्यावेळी गोयलशी बोलताना महिलेने आईला गुडघ्यामध्येही प्रचंड वेदना होत असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीने एका डॉक्टरचा संपर्क क्रमांक दिला आणि उपचार घेण्याचा सल्ला दिला, असे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आहे. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या आईने दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला असता संबंधित व्यक्तीने आपली ओळख डॉ. झफर मर्चंट अशी करून दिली. त्याने तक्रारदार महिलेचा घराचा पत्ता घेतला आणि तिथे जाऊन गुडघ्याची साधी शस्त्रक्रिया केली. त्याने दोन्ही गुडघ्यांवर कापून त्यातून रक्त काढले. ते रक्त एका कागदावर पसरवले. त्यावर हळद लावली आणि नंतर कागद फेकून दिला. त्यानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे असे सांगत आईच्या गुडघ्याचा त्रासही दूर झाल्याचे सांगितले. शिवाय, उपचारासाठी सात लाख २० हजार रुपये शुल्क मागितले. तक्रारदार आणि तिच्या आईने सव्वा सात लाख रुपये रोख रक्कम म्हणून दिले.

हेही वाचा:हरित लवादामुळे राज्यातील गृहप्रकल्प पुन्हा रखडणार!

शस्त्रक्रियेनंतरही आईला गुडघ्यात वेदना होऊ लागल्या, म्हणून त्यांनी डॉ. मर्चंटशी पुन्हा संपर्क साधला. मात्र, त्याचा फोन बंद होता. त्यांनी विनोद गोयलला दूरध्वनी केला, त्यानेही त्यावेळी खोटी आश्वासने दिली. नंतर मात्र दोन्ही आरोपींनी तक्रारदारांच्या कुटुंबियांचे दूरध्वनी उचलणे बंद केले. त्याच दरम्यान तक्रारदार महिलेची सासू व सासऱ्यांचे निधन झाल्यामुळे त्या तत्काळ तक्रार देऊ शकल्या नाही. त्यानंतर डॉ. मर्चंटने पश्चिम उपनगरातील इतर वृद्ध नागरिकांना देखील याच पद्धतीने फसवल्याचे वृत्त तक्रारदार महिलेने वाचले. अखेर दोन महिने प्रतीक्षा केल्यानंतर त्यांनी मंगळवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी डॉ. मर्चंटविरुद्ध भारतीय दंड संहिता ४१९ (तोतयागिरी) आणि ४२० (फसवणूक) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी व्यक्तींची फसवणूक केली असल्याचा संशय आहे.