मुंबई : म्हाडाने धारावी पुनर्वसन प्रकल्पाला (डीआरपी) रेल्वेची जागा संपादित करण्यासाठी स्वनिधीतून २०० कोटी आणि महाराष्ट्र निवारा निधीतून ३०० कोटी असा एकूण ५०० कोटी रुपये निधी दिला होता. हा निधी परत मिळावा यासाठी म्हाडाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर डीआरपीने म्हाडाला ५०० कोटी रुपये परत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हाडाच्या विविध मंडळाच्या माध्यमातून राज्यभर मोठ्या संख्येने गृहप्रकल्प, पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मुंबई मंडळ बीडीडी पुनर्विकासासह अनेक मोठ्या खर्चाचे प्रकल्प राबवित आहे. मागील काही महिन्यांपासून म्हाडाच्या तिजोरीत खडखडाट असून बीडीडी प्रकल्पासाठी निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे आता म्हाडा प्राधिकरणाने सरकारी यंत्रणांकडून आपले पैसे मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. समृद्धी महामार्गासाठी म्हाडाने एक हजार कोटी रुपये दिले असून रेल्वेची जागा संपादित करण्यासाठी डीआरपीला ५०० कोटी रुपये दिले होते.

हेही वाचा : शिवडी, परळमधील चार सामुदायिक प्रसाधनगृहांचे बांधकाम सुरू; पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन

अखेर डीआरपीने ५०० कोटी रुपये परत केल्याची माहिती म्हाडा अधिकाऱ्यांनी दिली. हा निधी मिळाल्याने आता म्हाडाच्या बीडीडी आणि अन्य प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान समृद्धी महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) देण्यात आलेले एक हजार कोटी रुपये परत मिळावेत यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai finally mhada received back its 500 crore rupees given to dharavi rehabilitation project mumbai print news css
Show comments