मुंबई : डोंगरी येथील निशाण पाडा मार्गावरील ‘अन्सारी हाईट्स’ या १५ मजली इमारतीला बुधवारी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने दुर्घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र आगीची तीव्रता वाढत असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. दरम्यान, आगीची तीव्रता वाढल्यामुळे अग्निशमन दलाने दुपारी २.०४ च्या सुमारास श्रेणी ३ ची वर्दी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : संजय दीना पाटील यांची खासदारकी अबाधित, आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. रहिवाशांनीही सुरक्षिततेची बाब लक्षात घेऊन इमारतीबाहेर पळ काढला. आगीची तीव्रता कमी होत नसल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाने दुपारी १.१३ वाजता आगीला क्रमांक एकची वर्दी दिली. मात्र आगीची तीव्रता वाढतच आहे. आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केल्यामुळे अग्निशमन दलाने आगीला क्रमांच ३ ची वर्दी दिली आहे. विविध अद्ययावत यंत्रणांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामकांकडून प्रयत्न सुरू आहेत.