मुंबई : यंदा तापमान वाढीमुळे जनसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. भविष्यात तापमान करी करण्यासाठी, वायू प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनी नवी मुंबई येथील सीवूड्स कोकण रेल्वे विहार येथे कोकण रेल्वेने पाच हजार रोपे लावून पर्यावरण दिन साजरा केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, आयएफएस अधिकारी विवेक खांडेकर आणि कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा उपस्थित होते. कोकण रेल्वेने पाच हजार रोपे लावून पर्यावरणासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. येत्या काळात पर्यावरण संवर्धन आणि रेल्वे मार्गाच्या सुशोभीकरणात योगदान देण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीसह पर्यावरणीय शाश्वततेसाठी दीर्घकालीन वचनबद्ध असणार आहे, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.