मुंबई : बोरीवलीमधील ६५ वर्षीय व्यक्तीवर उपचार करण्याच्या नावाखाली बनावट डॉक्टरांच्या टोळीने ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने नुकतीच बनावट डॉक्टरांच्या टोळीला अटक केली होती. त्याच टोळीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय आहे. दरम्यान, बनावट डॉक्टरांच्या या टोळीने फसवणूक केलेले आणखी दोन तक्रारदारांची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.

बोरीवली येथील ६३ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बनावट डॉक्टरांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी राहुल बजाज, डॉक्टर पटेल व त्यांचा सहाय्यक इम्रान यांच्याविरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतीच गुन्हे शाखेच्या कक्ष-३ ने वडाळ्यातील एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी बनावट डॉक्टरांच्या टोळीला अटक केली होती. मोहम्मद शेरु शेख मकसुद खॉ उर्फ डॉ. आर. पटेल (४९), मोहम्मद नफीस मोहम्मद शरीफ (३९), मोहम्मद आसिफ मोह. निसार (२७) व मोहम्मद अशिफ मोह. शरीफ (४४) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

pune cyber crime latest news
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची २५ लाखांची फसवणूक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune police loksatta news
पिंपरी : रूग्णालयात गुंतवणुकीच्या बहाण्याने सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याची सव्वाकोटीची फसवणूक
Shocking video of elder woman dies because of doctor watches reels in manipur hospital viral video in up
डॉक्टर की हैवान? मरणाच्या दारात असलेल्या महिलेला सोडून मोबाईलवर बघत होता रील, VIDEO पाहून बसेल धक्का
Fraud of pretext of loan approval Pune
पिंपरी: कर्ज मंजुरीच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक
job , post department , fake marksheet,
बनावट गुणपत्रिकेद्वारे टपाल खात्यात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न, फसवणूकप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
6 arrested for 40 lakh medical college admission scam
वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक; हडपसर पोलिसांकडून सहा जणांविरुद्ध गुन्हा
suspect arrested for inciting girl doctor suicide
डॉक्टर तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणारा अटकेत; नवी मुंबईत सांगलीतील डॉक्टर ताब्यात

हेही वाचा : आज मुंबईतून पुण्याला जाण्याचा विचार करत असाल तर हे वाचाच….

वडाळा येथील तक्रारदार राजेश पाटील (६१) यांना ट्रेमर या आजारावर खात्रीशीर उपचार करून त्यांना तात्काळ बरे करण्याचे आमीष या टोळीने दाखवले होते. त्यानंतर पाटील यांच्या वडाळा येथील निवासस्थानी येऊन आरोपी पटेल व त्याचे सहाय्यकाने तपासणी केली. त्यावेळी पित्तामुळे त्यांच्या शरीरातील नसा दबल्याचे सांगून, त्यामुळेच तक्रारदार यांचे दोन्ही हात थरथरत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही बाजूस छिद्र असलेली मेटल क्युबने (तुंबडी) तक्रारदारांच्या दोन्ही हाताला व पाठीला लावले. त्यावेळी आरोपींनी तक्रारदाराचे रक्त साठवून झालेल्या व्रणावर रसायन टाकले. त्यावेळी तेथील रंग पिवळा झाल्याचे दाखवून तक्रारदार यांच्या शरिरात वाढलेले पित्त बाहेर काढत असल्याचे भासवून त्यांच्याकडून १४ लाख ५० हजार रुपये उकळले होते.

हेही वाचा : विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीबाबत अनिश्चितता

अशाच कार्यपद्धतीचा वापर करून बनावट डॉक्टरांच्या एका टोळीने बोरीवलीतील एका कुटुंबाची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणातील तक्रारदार महिलेच्या पतींना प्लाझ्मा सेलचा कर्करोग झाला होता. त्यांना डाव्या हाताने कोणतीही वस्तू उचलता येत नव्हती. आरोपींनी त्यांनाही अहमदाबाद येथील डॉक्टर पटेल यांच्या नावाने भेट घेतली. आरोपींनी शरिरातील पित्त काढण्यासाठी उपचार करून तसेच औषधांच्या नावाखाली ५० लाख रुपये उकळले. त्यामुळे गुन्हे शाखेने अटक केलेल्या टोळीचा याप्रकरणात सहभाग असल्याचा संशय आहे. याबाबत गुन्हे शाखेतील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत दोन आणखी तक्रारदार पुढे आले आहेत. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली असून अटक केलेल्या आरोपींच्या सहभागाबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader