मुंबई : सोने तस्करीप्रकरणी वर्षभरानंतर एकाला अटक करण्यात महसूल गुप्तचर संचालनायाला (डीआरआय) यश आले आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून या अधिकार्‍यांनी सुमारे सव्वादोन कोटींचे सोने जप्त केले होते. दुबईहून सोने तस्करी करणार्‍या काही टोळ्या सक्रिय आहेत. त्या टोळ्या विविध मार्गाने दुबईतून सोने आणून त्याची भारतीय बाजारात विक्री करतात. त्यांना रोखण्यासाठी डीआरआयने सापळा रचला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी मे महिन्यांत दुबईहून कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून येणार्‍या प्रत्येक प्रवाशासह त्यांच्या सामानाची झडती सुरु केली होती. त्यावेळी दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगेतून सुमारे सव्वादोन कोटींचे सोने डीआरआयने जप्त केले होते.

हेही वाचा : ठाकरे गटाला प्रचारात समाजवादी पक्षाचे बळ

गोल्ड तस्करीप्रकरणी नंतर दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत नरेश देवूरकर याचा सहभाग असल्याचे उघडकीस आले होते. मात्र त्या दोघांच्या अटकेनंतर तो पळून गेला होता. तोच त्याच्या इतर सहकार्‍यांच्या मदतीने दुबईतून सोन्याची तस्करी करत होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी त्याला अधिकार्‍यांनी अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai gold smuggler arrested after a year by dri mumbai print news css