मुंबई : आरोग्य विभागात ‘गट ब’ मधील पदांवर कार्यरत असलेल्या जवळपास ७५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना सरकारने मागील अनेक वर्षांपासून पदोन्नती दिलेली नाही. त्यातील अनेक अधिकाऱ्यांची सेवा २४ वर्षे सेवा झाली आहे. आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयांत ‘गट ब’ संवर्गातील अधिकारी कार्यरत आहेत. राज्यात आरोग्य विभागातील विविध कार्यालयांमध्ये जवळपास ७५० वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. सरकारी नियमानुसार नियुक्तीनंतर तीन वर्षांनी पदोन्नती मिळणे गरजेचे असते. मात्र ‘गट ब’ संवर्गामध्ये कार्यरत असलेल्या जवळपास ७५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती झाल्यापासून एकदाही पदोन्नती मिळालेली नाही. त्यातील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची २४ वर्षांची सेवा पूर्ण झाली आहे. अनेक वैद्यकीय अधिकारी कोणतीही पदोन्नती न घेता निवृत्त झाले आहेत. या अनास्थेमुळे अधिकाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांना मानसिक तणावालाही सामोरे जावे लागते आहे, असे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा