मुंबई : गेले काही दिवस मुंबईमध्ये हवेतील आर्द्रतेमुळे उकाड्याची जाणीव कायम आहे. दरम्यान, मुंबईत रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच या कालावधीत तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहीस असा अंदाज देखील वर्तविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईकरांना गेले काही दिवस उष्ण व दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. उष्मा अधिक जाणवत असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३२.६ तर सांताक्रूझ केंद्रात ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईत रविवार आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणे, रायगड जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवार या तिन्ही दिवशी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘जय भवानी’वरील बंदी कायम; प्रचारगीताबाबत ठाकरे गटाची फेरविचार याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली

काय काळजी घ्यावी

दुपारी घरातून बाहेर पडताना छत्रीचा वापर करावा.

थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे.

उन्हामुळे तब्येत बिघडल्यानंतर तात्काळ संबंधिताला रुग्णालयात दाखल करावे.

उष्णतेच्या झळांमुळे त्रास जाणवल्यास तात्काळ सावलीत बसावे.