मुंबई : मागील काही दिवस मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, बुधवार, २४ जुलै रोजीही पुढील काही तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबई तसेच उपनगरांत मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. आज सकाळपासून उपनगरातील अंधेरी, पवई, वांद्रे परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हेही वाचा : मुंबई: ‘मेट्रो ३’ कामामुळे आरेमधील रस्ते जलमय
कमी दाबाचे क्षेत्र, किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा यामुळे मागील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचाच परिणाम म्हणून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे.
आजचा पावसाचा अंदाज
मुसळधार ते अतिमुसळधार
ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पुणे , कोल्हापूर</p>
मुसळधार
मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव</p>
अतिवृष्टी
रायगड,सातारा
वादळी वाऱ्यासह पाऊस
चंद्रपूर, नागपूर, वर्धा
हलका ते मध्यम पाऊस
सांगली, सोलापूर , जालना, परभणी, बीड, हिंगोली,नांदेड