मुंबई : मुंबईत रविवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर वाढला आहे. शहर भागात अधिक पाऊस असून सकाळी आठ वाजल्यापासून शहर भागात ११ वाजेपर्यंत ३३ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र ११ वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून ११ ते १२ या एक तासात कुर्ला परिसरात सर्वाधिक ४० मिमी पावसाची नोंद झाली.
मुंबईत शनिवारपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. रविवारी देखील पावसाचा जोर कायम होता. रविवारी सकाळपासून पाऊस पडत असून सकाळी ८ ते ११ या वेळात शहर भागात ३३ मिमी पावसाची नोंद झाली. तर पूर्व उपनगरात १५ मिमी आणि पश्चिम उपनगरात १३ मिमी पावसाची नोंद झाली. तर ११ ते १२ या वेळेत मुंबईला अक्षरशः पावसाने झोडपून काढले. यावेळेत पूर्व उपनगरातील कुर्ला परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
हेही वाचा : Mumbai Rain Alert: मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज, पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली
समुद्राला दुपारी भरती
रविवारी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी समुद्राला भरती आली असून समुद्रात ४.४४ मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. त्यातच पावसाचाही जोर वाढला आहे.
कुठे किती पाऊस
शहर
काळा किल्ला धारावी …२७ मिमी
प्रतिक्षानगर, शीव……२६ मिमी
परळ ….१६
हेही वाचा : जागा काढून घेतल्याने अश्व शर्यतींच्या शुल्कात कपात
पूर्व उपनगर
कुर्ला ….४० मिमी
घाटकोपर …२८ मिमी
चेंबूर …२५ मिमी
विद्याविहार …२४ मिमी
हेही वाचा : भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडूनही प्रवक्त्यांची फौज
पश्चिम उपनगर
कांदिवली ….३८ मिमी
मालाड मालवणी …३५ मिमी
चारकोप ..३४ मिमी
तबीकेसी …३१ मिमी