मुंबई : मुंबई महानगरातील घरांना मागणी वाढत असून यंदा पहिल्या तिमाहीत ६० हजार ७१९ अशी विक्रमी घरांची विक्री झाली आहे. या घरांच्या विक्रीतून विकासकांना ५४ हजार २३९ कोटींची भरघोस कमाई झाली आहे. ठाणे, डोंबिवलीसह मीरा रोड, विरार, उलवे, कांदिवली येथील घरांना खरेदीदारांनी विशेष पसंती दाखविली आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने स्क्वेअर यार्ड या खासगी कंपनीने संकलित केलेल्या तपशिलातून ही माहिती उघड झालीआहे.

मुंबई महानगरातील ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांची सर्वाधिक विक्री झाली आहे. या खालोखाल ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या घरांना मागणी होती. एक कोटी रुपयांवरील घरांची विक्री २६ टक्के इतकी झाली. ५०० चौरस फुटांच्या घरांची मागणी सर्वाधिक असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वाधिक घरविक्रीमध्ये खरेदीदारांनी ठाणे पश्चिम परिसराला पसंती दिली आहे. पहिल्या तिमाहीत ठाणे पश्चिम परिसरात पाच हजारहून अधिक घरे विकली गेली असून त्यातून विकासकांना चार हजार ९४८ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यानंतर डोंबिवलीचा क्रमांक लागतो. दोन हजार ९८५ घरांच्या विक्रीतून विकासकांना १२९६ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यानंतर मीरा रोड येथील घरांना मागणी असल्याचे दिसून येते. दोन हजार ८४८ घरांच्या विक्रीतून १७५२ कोटी रुपये विकासकांना प्राप्त झाले. विरार (पश्चिम), उलवे, कांदिवली पश्चिम तसेच बदलापूर पूर्व येथे पाच हजार घरांची विक्री झाली. त्यातून विकासकांना २४०० कोटी रुपये मिळाले.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
house lottery application, deadline, Navi Mumbai,
घरे सोडत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचे अनेकांचे मत

हेही वाचा : लोकसभा निवडणूक होईपर्यंत संकुलात आंदोलन, मोर्चा, कार्यक्रमास बंदी; ‘टिस’कडून परिपत्रकाद्वारे नियमावली जाहीर

या अहवालानुसार, लोढा समूहाच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्सची १८८१ घरे विकली गेली असून त्यातून त्यांना २३१८ कोटी मिळाले आहेत. त्यापाठोपाठ ओबेरॉय रिअॅल्टीने घरविक्रीतूल महसुलात (१७१७ कोटी) तर रुणवाल समूहाने घरांच्या विक्रीत (६७९) दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुंबईतही प्रामुख्याने छोट्या घरांना अधिक मागणी असून कांदिवली पश्चिम परिसरात सर्वाधिक घरांची विक्री झाली आहे.

हेही वाचा : मुंबईत रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा; ठाणे, रायगड जिल्ह्यात आज, उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुणे आघाडीवर…

मुंबई महानगरापाठोपाठ पुण्यातही घरांची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढली आहे. मार्च २०२४ अखेर २१ हजार २४४ घरांची विक्री झाली. हाच आकडा गेल्या मार्च महिन्यात १४ हजार ३०९ इतका होता. पुण्यातही ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या घरांना सर्वाधिक मागणी नोंदली गेली. २५ लाख ते ५० लाख घरांसाठी ३२ टक्के तर २५ लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांसाठी २१ टक्के मागणी होती, असे नाइट फ्रँकच्या एका अहवालात म्हटले आहे. पुण्यात पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत असल्यामुळेच घरांची मागणी वाढली आहे. परवडणाऱ्या किमती आणि घरविक्रीसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे येत्या काही महिन्यांत पुण्यात घरविक्रीच्या संख्येत आणखी वाढ होईल, असा अंदाज नाइट फ्रँकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी व्यक्त केला आहे.