मुंबई : ओशिवरा येथील ‘सुरभी’ या आजी-माजी न्यायाधीशांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील १५०० चौरस फुटाच्या सदनिकेची किंमत एक कोटी ४२ लाख ९३ हजार ३६७ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ओशिवरासारख्या परिसरात प्रति चौरस फूट फक्त साडेनऊ हजार रुपये दराने न्यायाधीशांना घरे मिळणार आहेत. ओशिवरा येथील म्हाडाचा तीन हजार चौरस मीटर भूखंड उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या ‘सुरभी’ सहकारी गृहनिर्माण संस्थेला सप्टेंबर २०१५ मध्ये देण्यात आला. हा मूळचा १० हजार ५०३ चौरस मीटर भूखंड यूटीआय कर्मचाऱ्यांच्या साईसमृद्धी सहकारी गृहनिर्माण संस्थेला देण्यात आला होता. परंतु, त्यातही अनियमितता झाल्याने म्हाडाने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यात म्हाडाच्या वाट्याला हा तीन हजार चौरस मीटर भूखंड आला.

या भूखंडावर म्हाडाने मध्यमवर्गीयांसाठी ७० घरांची योजना राबविण्याचे ठरविले. त्यानुसार २०१० मध्ये मे. बी. जी. शिर्के कंपनीला स्टिल्ट व २४ मजल्यांची इमारत बांधण्याबाबत स्वीकृती पत्रही दिले. मात्र, ती योजना आकार घेऊ शकली नाही. अखेरीस हा भूखंड न्यायाधीशांच्या गृहनिर्माण संस्थेला म्हाडा कायदा १३(२) मध्ये देण्यात आला. स्टिल्ट अधिक तीन मजली पोडिअम अधिक ३२ मजले अशी ९२ सदनिकांची इमारत बांधण्याचे कंत्राट मे. बी. जी. शिर्के कंपनीलाच देण्यात आले. या पोटी १५९ कोटी ९३ लाख ६६ हजार २२ रुपयांची प्रशासकीय मान्यता असलेला ठराव म्हाडा प्राधिकरणाने मंजूर केला. पहिल्या टप्प्यात मे. शिर्के कंपनीला ६० सदनिका बांधण्यासाठी स्वीकृतीपत्र देण्यात आले होते. आता ७२ सदनिकांच्या बांधणीसाठी अंदाजे ९० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. प्राधिकरणानै अलीकडे १०२ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. याआधी १०६० चौरस फूट कारपेट आकाराची ९२ घरे बांधली जाणार होती. आता १५०० चौरस फुटाची ७२ घरे मिळणार आहेत.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
AMU minority status upheld 1967 decision quashed by Supreme Court
‘एएमयू’चा अल्पसंख्याक दर्जा कायम, १९६७ चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; नियमित खंडपीठात सुनावणी

हेही वाचा : घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका

प्रशासकीय मंजुरी भरमसाटच! १५९ कोटींऐवजी आता खर्च १०२ कोटी!

न्यायाधीशांच्या सोसायटीच्या इमारत उभारणीसाठी म्हाडाने दिलेली प्रशासकीय मंजुरी रक्कम भरमसाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले होते. या प्रकल्पासाठी सुरुवातीला १५९ कोटींची प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली होती. आता प्रत्यक्षात १०२ कोटी इतकाच खर्च असल्याचे स्पष्ट झाले आहे.