मुंबई : चार लाखांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली प्राप्तीकर अधिकाऱ्याला शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. मालमत्ता विक्रीबाबत टीडीएस प्रमाणपत्र जारी करण्यासाठी आरोपीने लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करत आहे.
हेही वाचा : मुंबई: पोलिसाच्या मृत्यूचे गूढ, मोबाइलची चोरी; विषारी इंजेक्शनची माहिती खोटी
विकास बन्सल असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते नरीमन पॉईंट येथील एअर इंडिया इमारतीच्या १७ व्या मजल्यावर कार्यरत होते. याप्रकरणी सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे मामा अनिवासी भारतीय आहेत.