मुंबई : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जे.जे. रुग्णालयामध्ये ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचे रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित विद्यार्थ्याचे रॅगिंग केल्याची तक्रार आल्यानंतर रॅगिंगविरोधी समितीने चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यावर कार्यवाही केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या २०२४-२५ मधील शैक्षणिक वर्षाला १४ ऑक्टोबरपासून नियमित सुरूवात झाली. मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जे.जे. रुग्णालयातही एमबीबीएसचे वर्ग सुरू झाले. दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी महाविद्यालयाच्या आवारामध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्याचे नाव विचारून त्याला नृत्य करण्यास सांगत होते.

हे ही वाचा…पिंपरी- चिंचवड: आयात उमेदवाराच आम्ही काम करणार नाहीत; शिवसेना ठाकरे गटाचा सर्वानुमते ठराव, पक्ष काय भूमिका….

त्याचदरम्यान तेथून जात असलेल्या रॅगिंगविरोधी समितीच्या एका सदस्यांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर रॅगिंगविरोधी समितीच्या बैठकीमध्ये ही तक्रार मांडण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत समितीने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार चौकशी केली. समितीच्या शिफारशीनुसार या दोन्ही विद्यार्थ्यांना एक वर्ष घरी बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai j j hospital shocking case of ragging of first year mbbs student come to light mumbai print news sud 02