मुंबई : राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर मार्डने त्यांचा राज्यव्यापी संप मागे घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १ मार्च २०२४ पासून महागाई भत्त्यासह प्रति महिना १० हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी; विरोधकांचा आरोप, चहापानावर बहिष्कार

या निर्णयामुळे प्रत्येक निवासी डॉक्टरांचे वैयक्तिकरित्या मानसिक, आर्थिक आणि सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी तसेच सामूहिकरीत्या सर्वांचे मनोबल वाढवण्यासाठी मदत होईल. त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे आभार मानतो असे सांगून मार्डच्या प्रतिनिधींनी रविवारी रात्री उशिरा आपला संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai maharashtra association of resident doctors mard strike is over mumbai print news css